विनोद वीर प्रभाकर मोरेंनी हाती बांधलं राष्ट्रवादीचं घड्याळ

मुंबई : राज्यातील प्रेक्षकांना हसविणाऱ्या विनोदवीर-अभिनेते प्रभाकर मोरे यांनी आता राजकारणात ‘एन्ट्री’ घेतली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थित त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे.

कलाकारांच्या व्यथा मांडण्यासाठी आपल राजकारणात आल्याचे प्रभाकर मोरे यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून प्रभाकर मोरे प्रेक्षकांनी प्रेक्षकांना खळखळवून हसविले.

मगील काही महिन्यांपासून ते समाजकार्यात सक्रीय आहेत. त्यामुळे ते राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी पक्षप्रवेशाची घोषणा केली आहे. अजित पवार यांच्या स्वभावामुळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचे मोरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

🤙 8080365706