
कोपार्डे : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.

सत्तारूढ़ नरके पॅनेलने पॅनेलच्या सर्व उमेदवारासाठी ‘अंगठी’ चिन्ह घेतले असून विरोधी राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलने ‘कपबशी’ चिन्ह घेतले आहे.. चार अपक्षांनी वेगळी चिन्हे घेतली आहेत.पाटील (ट्रॅक्टर), अनुसूचित जाती किंवा अनु. जमाती कोंडिबा कांबळे (विमान) व नाथा माळवी (पतंग), इतर मागासवर्गीय सदस्य प्रकाश चौगले (विमान) १२ फेब्रुवारीला प्रत्यक्ष मतदान असून १४ रोजी निकाल आहे.
निवडणूक कार्यक्रम कालावधी ३५ दिवसांचा आहे. दोन दिवसांत प्रचाराचा नारळ फुटणार असून रणधुमाळी सुरू होणार आहे. वैयक्तिक भेटी-गाठी सुरू झाल्या असून नेते मंडळी नाराजांच्या अपक्षामध्ये गट क्रमांक ४ सरदार मनधरणीत आहेत.
