भारती स्पोर्टस् सावकर चषकाचा मानकरी:स्वर्गीय दिलीप जोशी यांच्या स्मणार्थ टेनिल बाँल क्रिक्रेट स्पर्धा

सावकर चषक टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेत विजेता ठरलेला भारती स्पोटर्स,मांगले या संघांला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करताना फक्ररुद्दीन मुजावर सोबत माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल यांच्यासह आदी मान्यवर.

पन्हाळा :शिवछत्रपती पुरस्कार विजेते  स्वर्गीय दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ पन्हाळगडावर इतिहासात पहिल्यांदाच संपन्न झालेल्या सर्वात मोठ्या सावकर चषक(2023) भव्य टेनिस बाँल क्रिक्रेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारती स्पोटर्स संघाने सहा गडी व चार बाँल शिल्लक ठेवत राजधानी स्पोटर्स, पन्हाळा संघावर मात करत सावकर चषकावर आपले नाव कोरले.

त्यामुळे राजधानी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग नोंदवला होता.पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी क्रिडाप्रेमींनी खोकड तलाव मैदानावर गर्दी केली होती.अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजधानी संघाने सात षटकात 89 धावा जमविल्या यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना भारती स्पोटर्स,मांगले 6:2 षटकात चार गड्याच्या मोबदल्यात 90 धावा जमवत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.या अंतिम सामन्यात भारती स्पोटर्स कडुन संदीप मकवाना,विजय पावले यांनी आपल्या बहरदार खेळाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली.

या अगोदर राजधानी संघांने पारगाव स्पोटर्स चा तर भारती स्पोटर्स ने स्व.सुरेश दादा कोरे प्रतिष्ठान यांचा उपांत्य सांमन्याच पराभुत करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.विजेत्या भारत स्पोटर्स संघाला चषक व रोख 75 हजार 555 रुपये,उपविजेता राजधानी संघाला चषक व 55 हजार 555 रुपये तर उपांत्य सामन्यात पराभुत स्व:सुरेश कोरे प्रतिष्ठान व पारगाव स्पोटर्स,पारगाव या संघांना प्रत्येकी चषक व रोख 10 हजार 555 रुपये देण्यात आले.स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणुन आंतरराष्ट्रीय खेळाडु विजय पावले, उत्कृष्ट फलंदाज म्हणुन शाहिद शेख,मालिकावीर म्हणुन संदीप मकवाना या खेळाडुंना वैयक्तिक पारितोषिक प्रदान करण्यात आले.या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पन्हाळा-पावनगडचे नेते फक्ररुद्दीन मुजावर यांनी,द्वितीय क्रमांकाे बक्षीस प्रसिद्ध काँनट्रँक्टर सचिन पाटील तर उपांत्य सामन्यात पराभुत संघांना माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल व शरयु लाड यांच्यावतीने बक्षीस देण्यात आले होते.मान्यवरांच्या हस्ते बक्षिस समारंभ पार पडला.

यावेळी फक्ररुद्दीन मुजावर, सचिन पाटील, माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल, माजी नगरसेविका तेजस्विनी गुरुव, यास्पर्धेचे सहप्रायोजक असणारे हाँटेल आँरेंज ग्रुपचे मालक मोहसीन मुजावर, अफताब आगा, चैतन्य भोसले, युवा नेते तय्यब मुजावर, माजी नगरसेवक अख्तर मुल्ला,नियाज मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.यास्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकिब मोकाशी, नवाज फरास, मन्नान फरास, अशपाक गारदी, मुनाफ मुजावर, मुतंजर मुजावर, मोहसीन मुजावर, साजिद मुजावर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

🤙 8080365706