आता महिलांच्या हाती लालपरीचं स्टेरिंग

मुंबई : महाराष्ट्राच्या लालपरीच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक एसटीचं स्टिअरिंग हाती घेणार आहेत. यासाठी पुणे विभागात 15 महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे.

यातील सहा महिलांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील महिला कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून त्या मार्च अखेरपर्यंत सेवेत रुजू होणार आहेत. मार्चनंतर लालपरीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती – स्त्री ही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पुरूषाच्या बरोबरीने ती सगळीकडे उभी राहते.वेगवेगळ्या क्षेत्रात पुरूषांच्या पुढे जाऊन नाव लौकिक मिळवत आहेत. मात्र, काही क्षेत्र अजूनही आहेत जिथे पुरूषांचे वर्चस्व कायम आहे आणि ते क्षेत्र म्हणजे एसटी. महाराष्ट्राच्या एसटीमध्ये आजवर एकही महिला ड्रायव्हर नव्हती. आता एसटीचे सारथ्यही महिला करणार आहेत.

🤙 8080365706