अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं संबोधित

दिल्ली : आज म्हणजेच मंगळवारपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं.

संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात राष्ट्रपती मुर्मू यांनी आत्मनिर्भर भारत, भ्रष्टाचार, सामाजिक न्याय यासह अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या आयुष्मान योजनेचंही कौतुक केलं. मुर्मू म्हणाल्या, ‘सरकारनं कोणताही भेदभाव न करता प्रत्येक वर्गासाठी काम केलंय, ते निश्चित कौतुकस्पद आहे.’राष्ट्रपतींनी आपल्या पहिल्या भाषणात सांगितलं की, ‘भारत आता हेरिटेजसोबतच तंत्रज्ञानातही आघाडी घेत आहे. ड्रोन आणि सौरऊर्जेमुळं देशातील शेतकरी सक्षम झाला आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या पंचप्राण योजनेमुळं आपल्याला गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालंय. गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत.’

🤙 8080365706