क्रेडाई महाराष्ट्राच्या सेक्रेटरी पदी विद्यानंद बेडेकर यांची निवड

कोल्हापूर: क्रेडाई महाराष्ट्राची सन 2023-25 ची कार्यकारीणी जाहीर झाली यामध्येऔरंगाबादच्या प्रमोद खैरनार यांची अध्यक्ष पदी तर कोल्हापूरच्या विद्यानंद बेडेकर यांची सेक्रेटरी पदी निवड झाली आहे. रियल इस्टेट क्षेत्रात देशपातळीवर बांधकाम व्यावसायिकाचे प्रश्नन मांडणारी व ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी संघटना म्हणून क्रेडाई गेली अनेक वर्षांपासून देश पातळीवर संघटनात्मक कार्य करीत आहे.

या संघटनेत 62 सिटी चाप्टर समाविष्ट आहेत.अशा ह्या अग्रगण्य क्रेडाई महराष्ट्र संघटनेच्या सन 2023-2025 या कालावधीसाठी नुकतेच कार्यकारी मंडळ जाहीर झाले. यामध्ये कोल्हापूरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व बेडेकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे भागीदार विद्यानंद बेडेकर यांची क्रेडाई महाराष्ट्राच्या नूतन कार्यकारणीत सेक्रेटरी म्हणून निवड झाली आहे. क्रेडाई चे राष्ट्रीय चेअरमन व महाराष्ट्र माजी अध्यक्ष कौन्सिल चे चेअरमन मगरपट्टा सिटीचे जनक .

सतीश मगर यांनी क्रेडाई महाराष्ट्राची 2023-25 साठीची नूतन कार्यकारणी घोषित केली.विद्यानंद बेडेकर हे गेली 14 वर्ष क्रेडाई कोल्हापूरच्या विविध पदावरती कार्यरत असून सध्या क्रेडाई कोल्हापूर चे अध्यक्ष आहेत.त्यांनी क्रेडाई महाराष्ट्र व क्रेडाई कोल्हापूरसाठी आजपर्यत दिलेल्या योगदानाचा विचार व त्याचा कामाचा अनुभव पाहता प्रथमच त्यांची क्रेडाई महाराष्ट्राच्या सेक्रटरी पदी निवड झाली .

क्रेडाई महाराष्ट्राची नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे प्रमोद खैरणार – अध्यक्ष (औरंगाबाद )

सुनील फुरडे आय.पी.पी. (सोलापूर)

महेश साधवानी – व्हाईस प्रेसिडेंट ( नागपूर )

सुनील कोतवाल व्हाईस प्रेसिडेंट (नाशिक)

रसिक चौहान – व्हाईस प्रेसिडेंट (नवी मुंबई )

आदित्य जावडेकर व्हाईस प्रेसिडेंट ( पुणे)

अनिश शहा व्हाईस प्रेसिडेंट (जळगाव )

राजेंद्र यादव व्हाईस प्रेसिडेंट ( कराड )

विद्यानंद बेडेकर सेक्रेटरी (कोल्हापूर )

नरेंद्रसिंग जाबिंदा ट्रेझरर (औरंगाबाद)

दिनेश ढगे जॉईंट सेक्रेटरी (अकोला)

रविंद्र खिलारे जॉईंट सेक्रेटरी ( सांगली)

शांताराम पाटील जॉईंट सेक्रेटरी (धुळे)

धर्मवीर भारती जॉईंट सेक्रेटरी (लातूर)

आशिष पोखरना जॉईंट सेक्रेटरी(अहमदनगर)

राजेश वाजे जॉईंट सेक्रेटरी (चिपळूण)

या निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना क्रेडाई महाराष्ट्राचे नूतन सेक्रेटरी बेडेकर म्हणाले माझ्यावर क्रेडाई महाराष्ट्राने सेक्रेटरी पद देउन मोठी जबाबदारी दिली आहे.मला दिलेल्या या बहुमानाचा व माझ्या अनुभवाचा उपयोग मी बांधकाम व्यवसायीकांचे व ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच करेन. या निवडीबद्दल त्यांनी क्रेडाई महाराष्ट्राचे आभार मानले.

🤙 8080365706