नववी दहावीच्या मुलींना पॉर्न व्हिडिओ दाखवला ; कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकाराने खळबळ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील विद्यालंकार शाळेत इंग्रजी विषयाचा शिक्षक व्ही.पी बांगडी याने शाळेतील नववी आणि दहावीच्या वर्गातील मुलींना पॉर्न व्हिडीओ दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील इंग्रजी विषयाचा शिक्षक असलेल्या बांगडीने या शिक्षकाने शाळेतील नववी आणि दहावीच्या मुलींना पॉर्न व्हिडीओ दाखवला. यानंतर या शिक्षकाची साताऱ्यामध्ये बदली करण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांमधून तसेच पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून केली जात आहे.

गेल्या दोन वर्षापासून शिक्षक बांगडीने हे असे प्रकार केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनींनी केला आहे. या शिक्षकाविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित विद्यार्थ्यांनी केली आहे. असा प्रकार शाळेमध्येच घडल्याने आता पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकाविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडित विद्यार्थीनींकडून करण्यात आली आहे.

🤙 8080365706