चेहऱ्याच्या त्वचेसाठी उपयुक्त नैसर्गिक अशा दुधाचा वापर

दूध हळद एका वाटीत २ ते ३ चमचे दूध घ्यावे, त्यामध्ये चिमूटभर हळद घालावी. हे दोन्ही एकत्र करुन कापसाच्या बोळ्याने ते चेहऱ्यावर लावावे. वाळल्यानंतर चेहरा पाण्याने धुवावा. यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा, निस्तेजपणा कमी होऊन चेहरा उजळण्यास मदत होईल.

 ब्युटी टिप्स : सौंदर्यासाठीही दुधाचा अतिशय चांगला उपयोग होतो याबाबत मात्र आपल्याला माहिती असतेच असे नाही. बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रॉडक्टमध्ये मलाईचा, दुधाचा वापर केल्याचे म्हटलेले असते. पण त्यापेक्षा नैसर्गिक अशा दुधाचा वापर चेहऱ्याच्या त्वचेसाठी केव्हाही उपयुक्त ठरतो.

हळद – दूध फेसपॅक

चेहऱ्याची गेलेली चमक परत आणण्यासाठी हळद आणि दूध यांचा फेसपॅक उपयुक्त ठरतो. त्वचेवरील घाण निघून जाण्यासाठी आणि चेहऱ्यावरील विषारी कण निघून जाण्यासाठी हा पॅक फायदेशीर ठरतो. यासाठी एका वाटीत १ चमचा चंदन पावडर किंवा मुलतानी माती घ्यायची. त्यामध्ये २-३ चमचे दूध आणि चिमूटभर हळद घालून सगळे चांगले एकजीव करावे. त्यानंतर साधारणपणे २० मिनीटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवावा. चेहऱ्यावर एकप्रकारचा छान ग्लो येण्यास मदत होते.

असा तयार करा स्क्रबर

वाटीत १ चमचा ओटमील पावडर घेऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार दूध आणि १ चिमूट हळद घालावी. हे मिश्रण फुगून वर येते ते स्क्रबसारखे चेहऱ्यावर वापरावे. त्यानंतर मसाज करुन ५ ते १० मिनीटांनी चेहरा धुवून टाकायचा. यानंतर आठवणीने मॉईश्चरायजर लावायला हवे.  

🤙 8080365706