
आजचे राशी भविष्य… जाणून घ्या काय लोहिलंय आज तुमच्या भाग्यात?
मेष:
आज स्थिरता लाभल्याने आनंद मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील होईल. महत्त्वपूर्ण निर्णय हे गुप्त ठेवा. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून मन समाधानी राहिल. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन उत्पनात वाढ होईल. व्यापारात आर्थिक दृष्ट्या प्रलंबित असणारी कामे पूर्णत्वास जातील. लक्ष्मीदायक दिनमान आहे. प्रशासकीय क्षेत्रातील, सुरक्षा व्यवस्थेतील व्यक्तींना विशेष लाभ होईल.
वृषभः
आर्थिक बाबतीत एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. अपेक्षीत लाभ मिळेल. नोकरीत आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळण्याची आज संधी आहे. राजकीय, कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. आर्थिक आवक वाढेल. आज आपल्या कामात उत्साह वाटणार आहे. बुद्धीचा वापर करुन पैशाची गुंतवणूक करा.
मिथुन:
आज मानसिक क्लेश उत्पन्न होईल. व्यक्तिगत समस्याचा प्रभाव कामावर राहिल. काही अप्रिय घटनेमुळे त्रास सहन करावा लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानी बळा. नोकरीत दुसऱ्यावर रोष करू नका. वाईट संगती पासुन सावध रहा. घरातील मौल्यवान वस्तु गहाळ किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. व्यवसाय रोजगारात मोठे परिवर्तन घडून देण्याची संभावना आहे.
कर्क:
आज घरगुती उपयोगी वस्तु खरेदी कराल. सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण होतील. नवीन योजनेचा शुभारंभ होण्याचा योग आहे. व्यवसायात यश मिळेल. अनेक नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. नोकरदार पत्नीकडून सहकार्य लाभेल. त्यांच्या बढतीचे योग आहेत. व्यापारात लाभ होऊन नफ्यात वाढ होईल. दूरवरचे प्रवास आनंददायक होतील.
सिंह:
आज संघर्ष करावा लागणार आहे. अपेक्षीत सफलता लाभणार नाही. दिवस धगधगीचा आणि धावपळीचा राहील. वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्या. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण कराल. कुटुंबातून आपल्या कामास सहकार्य लाभणार नाही. निरर्थक कामात वेळ वाया घालवू नका. वेळेचा अपव्यय टाळा. शेअर मार्केट व्यापारात गुंतवणूक करण्यासाठी दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. स्थावर मालमत्तेत काही अडचण येण्याची शक्यता आहे.
कन्या:
आज भाग्याची साथ लाभणार आहे. आपल्या कामात बुद्धी चातुर्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. अत्यंत अनुकुल दिवस आहे. समाजात व कुंटुंबात मानसन्मान मिळेल. नवीन योजना फायदेशीर ठरतील.व्यापारात काही नवीन भागीदारासोबत संबंध प्रस्थापित कराल. गृहसौख्य जोडीदाराकडून सहकार्य लाभेल.प्रवासातून लाभ घडतील. जुणी येणी वसुल होतील.
तूळ :
आज प्रतिकूल दिनमान राहील नोकरीत मनाजोग्या घटना घडणार नाहीत. विपरित परिणाम दिसतील. वरिष्ठांकडून नाराजी आढवून घ्याल. मानसिक स्वास्थ बिघडेल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शारिरीक व्याधी जुने आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. जीवन साथीसोबत वैचारिक पातळीवर मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारिक प्रकरणात जबाबदारी वाढणार आहे. आपआपसातील वाद समझदारीने मिटवा.
वृश्चिक:
आज रोजगारातील परिस्थिती सामान्य राहणार आहे. मितभाषी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. तरूण तरुणीचे विवाह योग जुळतील. प्रेमप्रकरणात कुटुंबाच्या विरोधात जावून कठोर निर्णय घ्यावे लागतील. प्रिय व्यक्तीबरोबर अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. आपल्या संशयीवृत्तीवर आवर घाला. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायातील चिंतेमुळे मन उदास राहील. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.
धनू:
आज शारिरिक स्वास्थ सांभाळा. आहारावर नियंत्रण ठेवा. आपल्या व्यसनांना आवर घाला. शारिरिक व्याधीचा कामावर विपरित परिणाम होईल. अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यास कसरत करावी लागेल. व्यापारात प्रतिस्पर्थ्यासोबत आव्हान निर्माण होईल. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. सयंमी भूमिका घ्या. आळस झटकून कामाला लागा.
मकर:
आज मनोधैर्य वाढेल. रोजगारात प्रतिमा आणि प्रतिश्रा उचांवेल. कार्यात विशेष यश येईल.मुलांच्या बाबतीत प्रसन्नतापूर्वक वातावरण राहणार आहे. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. उताविळपणा करु नका. नोकरी व्यापारात योग्य प्रतिसाद मिळेल. कुटुंबात शुभकार्याचे आयोजन केले जाईल. साहित्यिक, समारंभात भाग घ्याल. मनोरंजनाकडे कल वाढेल.
कुंभ:
आज कौटुंबिक वातावरण व आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्याने आनंदी रहाल. वडिलोपार्जित इस्टेट वास्तू या विषयी कामे पार पडतील. नवीन घर खरेदीचा योग आहे. आपल्या वस्तुची देखभाल कराल. नोकरीत इच्छेप्रमाणे बदली किंवा बढ़ती मिळण्याचे योग आहेत. मित्र,सहकारी यांची मदत मिळेल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी रहाल.
मीनः
आज आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. रोजगारात प्रगती होईल. जबाबदारी वाढणार आहे. आपले कर्तुत्व सिद्ध कराल. पराक्रम व साहसी वृत्तीत वाढ होईल. व्यापारात नवीन संधी सोडू नका. नोकरीत एका नव्या समुहाशी आपला संबंध जुळण्याचा योग आहे. कुटुंबातील सदस्याकडून उत्तम सहकार्य लाभल्याने स्नेह वाढेल. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य लाभेल.
