पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज देशवासीयांसोबत मन की बात…

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. 2023 या नवीन वर्षातील मन की बातचा हा पहिलाच भाग होता.

पंतप्रधानांनी आज तृणधान्याचे महत्व सांगितले. ज्वारी आणि बाजरी आरोग्यासाठी चांगली असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.पंतप्रधान मोदी यांनी पद्म पुरस्कार मिळालेल्या सर्वांचं अभिनंदन केलं.पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा हा 97 वा भाग होता. मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान अनेकदा लोकांना प्रेरणादायी गोष्टी सांगत असतात. यावर्षी आदिवासी समुदाय आणि आदिवासी समाजाशी संबंधित लोकांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत, त्यांचेही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. आदिवासी जीवन शहरी जीवनापेक्षा वेगळे आहे. त्यांना खूप आव्हानांचा सामना करावा लागतो. एवढ्या सगळ्यात आदिवासी समाज आपल्या परंपरा जपण्यासाठी नेहमीच तत्पर असतो असेही पंतप्रधान म्हणाले. जगाला तृणधान्याचे महत्व समजल्यामुळं शेतकरी खुश आहेत.

🤙 8080365706