चकोते ग्रुपच्या अद्ययावत प्रकल्पाचा केंद्रिय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते मोठ्या दिमाखात उदघाटन..!

कोल्हापूर : चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या आजवरच्या वाटचालीतील सोनेरी पाऊल म्हणजेच नूतन अद्ययावत प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) तसेच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रमुख पाहुणे होते.शून्यातून विश्व निर्माण करण्याबरोबरच निर्माण केलेले विश्व चिरकाल टिकवून ठेवणारा उद्योजक स्वत:चा ‘ब्रॅण्ड’ ठरवितो. स्वत:ची ओळख स्वत:च निर्माण करून ती ओळख तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवितो. नांदणीतील ‘चकोते उद्योग समूह’ हा त्यापैकीच एक नामांकित ‘ब्रॅण्ड’. आण्णासाहेब चकोते यांनी शून्यातून निर्माण केलेला हा ‘ब्रॅण्ड‘ सध्या प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. एका शेडमध्ये या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आण्णासाहेबांच्या जिद्द, चिकाटीच्या जोरावर या उद्योगाने खऱ्या अर्थाने गगनभरारी घेतली.

टेक्नॉलॉजी, स्वयंचलित उत्पादन सुविधा, स्वच्छता व सुरक्षेसाठी लागणारे हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर असणारा तसेच अधिक उत्पादन क्षमतेच्या नवीन प्रकल्पाची आखणी आण्णासाहेब चकोते यांनी केली.या वेळी मंत्री नितीन गडकरी यांनी छोट्याशा गावामध्ये सुरु केलेल्या या बेकरीला मल्टिनॅशनल कंपनी अशी वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल अण्णासाहेब चकोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. पारिवारिक भावनेतून यश मिळवत लोकांच्या मनावर विश्वास संपादन केला यामुळे कोल्हापूर वासीयांनाच नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाला अभिमानास्पद चकोते ग्रुपचे कार्य असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले. ब्रँड बनवणं खूप कठीण आहे. प्रत्येक क्षेत्र एक वेगळं ब्रँड असतो आणि हा ब्रँड टिकवण्यासाठी विश्वसनीयता हेच २१ व्या शतकातील सगळ्यात मोठा भांडवल आहे. तसेच मराठी अस्मितेला पुढे न्यायचे असेल तर उद्योगवणी आणि व्यवसायाला पुढे जाणे गरजेचे असल्याचे मंत्री गडकरी यांनी संगितले.

उद्घाटनाला खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक, संजयकाका पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कामगार व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा येथील सहा हजारांहून अधिक वितरक, रिटेलर्स, मित्रपरिवार आणि हितचिंतक उपस्थित होते.

🤙 8080365706