
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज, सोमवारी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण होणार आहे.विधान भवनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीविषयी संध्याकाळी उशिरापर्यंत अनिश्चितता होती.बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाच्या सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सर्वांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
