रात्री झोपताना आपल्या मनात कोणतेही विचार येऊ नयेत यासाठी काय करावे?

आरोग्य टिप्स : रात्री लवकर झोप न येण्यामागे बरीच कारण असतात, रात्री झोपताना सुद्धा विचार करत राहणे हे त्यातील एक मुख्य कारण असून रात्री झोपताना आपल्या मनात कोणतेही विचार येऊ नयेत यासाठी झोपण्यापूर्वी काय करावे, हे समजून घेऊयात.

इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स वापरणं टाळा – रात्री झोपण्याच्या किमान २ तास आधी मोबाईल, लॅपटॉप, टेलिव्हीजन, कॉम्प्युटर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सचा वापर करणे टाळा. काही जण रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरत असतात. ही अतिशय वाईट सवय आहे. कारण या सवयीमुळे आपल्या झोपेवर दुष्परिणाम होत राहतात. आपल्या शरीरातील ‘मेलाटोनिन’ हार्मोन्स आपल्या झोपेचे चक्र नियंत्रणात ठेवत असते. या विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणातून निर्माण होणाऱ्या ब्लू रेजमुळे मेलाटोनिन हार्मोन्सचे उत्पादन रोखले जाते. परिमाणी आपल्या झोपेचे चक्र बिघडून आपल्याला वेळेवर झोप येत नाही.   दैनंदिनी लिहिण्यास सुरुवात करा – रात्री झोपण्याच्या आधी दैनंदिनी लिहिण्याची सवय करा. आपल्यासोबत दिवसभरात काय घडले ?, आपण दिवसभरात काय काय केले?, किंवा आपल्या मनात जर काही विचार येत असतील तर ते विचार लिहून काढण्याचा सराव करा. असे केल्याने तुमच्या डोक्यातील विचार कागदांवर उतरतील आणि तुमच्या डोक्यात जे विचार सुरु आहेत ते थांबतील. आपल्या मनातील भावना आणि डोक्यातील विचार लिहून काढल्याने मन आणि मेंदू शांत राहतो. त्यामुळे झोपताना सतत काही विचार येत नाहीत. परिणामी चांगली झोप लागते. ध्यानधारणा करा – झोपण्यापूर्वी ध्यानधारणा करा. ध्यानधारणा केल्याने मानसिक व शारीरिक शांतता प्राप्त होते. आपल्या शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. स्ट्रेस, सतत डोक्यात चालू असलेला विचारांचा गदारोळ, चिडचिडेपणा, भीती, आकांक्षा-अपेक्षांचं ओझं या आणि अशा अनेक कारणांनी मेंदू सतत बिझी राहतो आणि म्हणून थकतो. नियमित ध्यान केल्याने मेंदूतील वैचारिक व भावनिक केंद्रे शांत राहतात. ध्यानधारणा करताना आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्यावर एक बिंदू धरून त्यावर लक्ष केंद्रित करा. असे केल्याने आपल्या मेंदूला चेतना मिळून आपल्याला फ्रेश वाटते.

🤙 8080365706