
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी EVM मशीनच एक प्रकारे समर्थन केलं आहे. संघटित होऊन एक गठ्ठा मतदान करा तर evm मशीन आपल्याकडून असेल, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

हे वाशिम इथं अमरावती विभागीय पदवीधर निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचारार्थ वाशिम येथे बोलत होते.नाना पटोले म्हणाले की, पश्चिम बंगालच्या निवडणुकीवेळी देशाचे पंतप्रधान तिकडे फिरत होते. पण तरीही तिथं भाजपचं सरकार आलं नाही. आपल्याकडे मतविभाजनामुळं यांचं सरकार आलं. एकजुटीनं आपण गेलो तर आपल्याला कुणी रोखू शकणार नाही, असं पटोले म्हणाले.नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्ष असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसंच विधानसभा निवडणुकीत मतदारांना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसह (EVM) मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना केली होती. महाराष्ट्र विधानमंडळाने यासंदर्भात कायदा करावा, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली होती. आता मात्र त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ईव्हीएमचं समर्थन केल्याचं दिसत आहे.
