
नागपूर : देवस्थान इनाम जमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान मोर्चातर्फे येत्या 24 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.सकाळी 11 वाजल्यापासून शेतकरी आंदोलनास बसणार आहेत.
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी देवस्थान इनाम जमीनी संपादीत केल्या आहेत त्याचा मोबदला राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार द्यावा, 50 टक्के रक्कम वहिवाटदार शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी आहे. यापूर्वी ही या विषयावर प्रशासकीय अधिकाऱ्यांसमावेत चर्चा झाल्या होत्या. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नाही. वास्तविक 1947 च्या पूर्वीपासून शेतकरी जमीनी कसत होते.7/12 कब्जेदार व इतर हक्कात त्याची नावेही आहेत.भूसंपादनासाठीच्या निवाडा नोटीसही याच शेतकऱ्यांच्या नावे आल्या आहेत. त्यानुसार इनाम जमीनी कसनाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहीजे अशी आग्रही मागणी या आंदोलनातून मांडली जाणार आहे, अशी माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उदय नारकर, नारायण गायकवाड, चंद्रकांत कुरणे, संभाजी मोहिते, आप्पा परिट आदीनी दिली आहे.
