प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनासाठी प्रथमेश पाटील याची निवड.

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा जागतिक केंद्रबिंदू असणारं संचलन म्हणजे नवी दिल्लीतील राजपथावर होणार शानदार संचलन. महाराष्ट्राच्या चित्ररथासह विविध वैशिष्ट्यांनी नटलेल्या सजलेल्या आणि भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचं प्रदर्शन करणाऱ्या या संचलनात सहभागी होण्याची प्रत्येक एनसीसी छात्राची इच्छा असते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कौटुंबिक आणि शैक्षणिक वाटचाल करणाऱ्या कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील छात्रसैनिक प्रथमेश सचिन पाटील याची राष्ट्रीय स्तरावरील एन. सी. सी संचलन साठी निवड झाली आहे.

तो देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेजमध्ये बी. बी. ए च्या दुसऱ्या वर्षात शिकत असून 05 महाराष्ट्र बटालियनचा तो छात्रसैनिक आहे. बटालियनच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात त्यानं आपली कला पेश करून वाद्य वाजणात सुद्धा अव्वल क्रमांक मिळवला आहे.

🤙 8080365706