
कोल्हापूर : आजच्या पत्रकार परिषदेनंतर गोकुळमधील सत्ताधाऱ्यांनी दिलेलं उत्तर पाहण्यात आलं. यामध्ये त्यांनी योजनांचा उल्लेख केलेला आहे. ज्याला मी कधीही विरोध केला नाही. चांगल्या गोष्टीला विरोध करणं हा महाडिकांचा स्वभाव नाही.. पण यामधून पद्धतशीरपणे मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी परत ते प्रश्न मांडतेय.
1) पंजाब मधून एका विशिष्ट जातीची म्हैस खरेदी करायचीच आणि तेही कर्ज काढून.. असा दबाव गोकुळच्या माझ्या कर्मचाऱ्यांवर कशासाठी ? यात कोणाचे आर्थिक लागेबांधे गुंतलेले आहेत ?
2) उत्पादकांना द्यायचे पैसे आणि ओव्हरचार्जेस (प्रोसेसिंग,वाहतूक वगैरे) सोडून ग्राहकावर लादलेल्या अतिरिक्त दरवाढीचेही पूर्ण पैसे उत्पादकांना का दिले नाहीत ? ते कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले ?
3) शौमिका महाडिक यांनी या गोष्टीला विरोध केला नाही असं जेव्हा सांगताय.. तेव्हा मी ज्या-ज्या गोष्टींना विरोध केला आणि माहिती मागण्यासाठी पत्रव्यवहार केले, त्याची उत्तरं का दिली नाहीत? हे का सांगत नाही ?
4) टेंडर प्रोसिजर न करता सहकाराचे नियम पायदळी तुडवून बगलबच्च्यांना किती टेंडर दिले ? कमिशनचे पैसे किती आणि कोणाच्या खिशात गेले ?
5) पशुखाद्य कारखान्यात तोटा झाला नाही, असं छातीठोकपणे सांगणारे आज कुठे लपून बसलेत ? तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे त्या विभागाला झालेल्या 5 कोटी 76 लाखाच्या तोट्याची जबाबदारी कोणाची ?
हे 5 च नाही.. अजून असे खूप प्रश्न आहेत.. पण आता इथून पुढे मी या भ्रष्टाचाऱ्यांकडे उत्तरं मागणार नाही.. शासकीय लेखापरीक्षणातून माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला आणि सर्व जिल्ह्याला मिळतील.. शेवटी आज जे म्हणतायत की माझ्या बोलण्याने संघाच्या ‘ब्रँड’ला धक्का पोचतो.. त्यांना मला एवढंच सांगायचं की आहे की, “मी नेहमी कागदपत्र घेऊन बोलते. याआधी सतत 10 वर्षं तुमचे सध्याचे नेते तोंडाला येईल ते बरळत होते, तेव्हा ब्रँडला धक्का पोचला नाही का? त्यामुळे सगळे अधिकारी एकत्र बसवून, त्यांना मारून मुटकून शौमिका महाडिकांना उत्तर द्या अशी जबरदस्ती करण्यापेक्षा, संघाच्या भल्याचा विचार केला असता तर महिन्याला 28 लाख लिटरने दुधाची घट संघाला आली नसती.”
सौ.शौमिका अमल महाडिक
