
कोल्हापुर : जागतिक आध्यात्मिक गुरु परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या दिव्य सानिध्यात मंगळवार दिनांक 31 जानेवारी 2023 सायंकाळी सहा वाजता तपोवन ग्राउंड ,कळंबा, कोल्हापूर येथे महासत्संग होत आहे.

दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7:00 वाजता महालक्ष्मी होमा होत आहे यानिमित्ताने आर्ट ऑफ लिविंग परिवार पेठ वडगाव चे साधक यांनी जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत या कार्यक्रमाचा मेसेज जाण्यासाठी आज सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक ते महालक्ष्मी मंदिर पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये कोल्हापूर वरून आर्ट ऑफ लिविंग महाराष्ट्राच्या टीचर कॉर्डिनेटर गीतांजली चिन्ननावर, आर्ट ऑफ लिविंग टीचर डॉक्टर बसरगे व भरतनाट्यम नर्तिका वैष्णवी जंगम हे सहभागी झाले होते. तरी सर्व जनतेने या महासत्संगचा व महालक्ष्मी होमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आर्ट ऑफ लिविंग पेठ वडगाव चे प्रशिक्षक जगदीश कुडाळकर यांनी केले.