
कागल : नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत कोणत्याही राजकीय पक्षाची कामे करू नयेत, जर एखादा कर्मचारी ड्युटीवर असताना राजकीय कामे करत असेल तर त्याच्यावर कडक कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने कागल नगर पालिकेचे मुख्याधिकारी श्रीराम पवार यांना दिले.

निवेदनात पुढे म्हटले आहे नगरपालिक कर्मचारी हे शासकीय कर्मचारी असून ते कोणत्याही पक्षाशी राजकीय कामासाठी बांधील नाहीत.पण बऱ्याच वेळा काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत कोणाच्यातरी सांगण्यावरून राजकीय पक्षाची कामे करीत आहेत. ही शासनाची फसवणूक आहे. यापुढे या गोष्टीला पाय बंद घातला पाहिजे. जे कर्मचारी अशी कामे करत असतील किंवा नेमून दिलेल्या कामात कामचुकार पणा करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी.तसेच नगरपालिकेच्या वतीने संपन्न होणाऱ्या सर्व शासकीय कार्यक्रमाला बऱ्याच वेळा ठराविक नेते व पदाधिकाऱ्यांना बोलवले जाते. भाजपच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना बोलवले जात नाही. असा पक्षपातीपणा करू नये. सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात यावे. या निवेदनावर भाजप शहर अध्यक्ष सुशांत कालेकर, बाळासाहेब जाधव ,गजानन माने, धीरज घाटगे, स्वप्निल शिंगाडे,हणमंत वड्ड , हिदायत नायकवडी, अशोक वड्ड ,रणजीत भरमकर, रणजीत डेळेकर ,बाळासो माळी , उमेश सावंत, बाळासो हेगडे , अरूण गुरव,संदीप नेर्ले, चेतन भगले,वसंत मांजरेकर विकी डोने, यांच्या सह्या आहेत.