ठाकरे आणि शिंदे गटासाठी महत्त्वाचा दिवस; चिन्ह आणि नावावर आज होणार सुनावणी

नवी दिल्ली: आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाला द्यायचं यावर सुनावणी करणार आहे.

यापूर्वी दोनदा सुनावणी झाली आहे. आज तिसऱ्यांदा सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोघांकडूनही पक्षाचं नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण यावर दावा सांगण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून पक्षाचं चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला.आज चिन्ह आणि नावाबाबत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

तीन वाजता सुनावणीला सुरुवात आज दुपारी तीन वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयात ही सुनावणी होणार असून या सुनावणीला तीनही निवडणूक आयुक्त न्यायाधीश म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करणार आहेत.

🤙 9921334545