ही वायफळ बडबड सतेज पाटलांनी बंद करावी : शौमिका महाडिक

कोल्हापूर :

रोखठोक!

माजी पालकमंत्री यांच्या आजच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ गोकुळच्याचं एका कर्मचाऱ्याच्या माध्यमातून माझ्या पाहण्यात आला.. त्यांना मला विचारायचं आहे.. 25 वर्षातला कारभार काढण्यापासून तुम्हाला कोणी रोखलेलं? तरीही वैयक्तिक खुन्नस ठेऊन तुम्ही संघाची जेवढी बदनामी करायची तेवढी केलीच.. त्याचेही पूरावे माझ्याकडे आहेत.. ते सगळं जाऊदे.. पण ज्या टँकरच्या मुद्यावरून तुम्ही जिल्हाभर धिंगाणा घातला.. त्या मुद्यावर तुमची सत्ता असताना मी पत्र दिलं होतं.. काय भ्रष्टाचार आहे दाखवा.. त्या विषयात तुमच्या या सत्तेत क्लीनचिट दिलेलं पत्र मला मिळालं.. आजही माझं चॅलेंज आहे.. तुम्ही आमचा भ्रष्टाचार दाखवा.. हरकत नाही..पण मागच्या 2 वर्षाचा हिशोब मी मागणार कारण या कालावधीत मी स्वतः संचालक आहे.. 5 वर्षासाठी जसे तुम्ही निवडून आले, तसंच मीपण संचालक म्हणून निवडून आले.. त्याच माणसांनी मलाही संचालक म्हणून निवडून दिलं.. मग माझ्या एकाही पत्राचं उत्तर देण्याचं धाडस तुम्ही का दाखवलं नाही ? तेव्हा वाटलं नाही का ? जनमताचा आपण आदर करावा ? यांनाही लोकांनी निवडून दिलंय.. हे शहाणपण तेव्हा सुचलं नाही का ? त्यामुळे ही वायफळ बडबड सतेज पाटलांनी बंद करावी..

बाकी सगळी उत्तरं मी सविस्तर 1-2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन नक्की देईन.. त्यांनतर जिल्ह्याला कळेल.. खरं कोण आणि खोटं कोण.. लक्षात ठेवा शौमिका महाडिक कधी विना पुराव्याची बोलत नाही.. आणि बोलणार पण नाही.. बाकी आमच्या विरोधकांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा !

🤙 9921334545