पाचगाव येथे युवकाचा निर्घृण खून..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाचगाव येथील योगेश्वरी कॉलनी जवळच्या गणपती मंदिरासमोर बुधवारी रात्री अज्ञातांनी हल्ला करून ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (रा. पाचवा बस स्टॉप, फुलेवाडी) या युवकाचा खून केला.

गुरुवारी सकाळी काही शाळकरी मुलांना मैदानात खेळताना त्यांचा चेंडू ओढ्याकडे गेला.तो चेंडू आणण्यासाठी गेलेल्या मुलांना हा मृतदेह दिसला.याबाबतची माहिती करवीर पोलिसांना फोन द्वारे कळवण्यात आले.त्यानंतर करवीर चे पोलीस उप अधीक्षक संकेत गोसावी यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचुन त्यांनी पंचनामा केला.

यावेळी या तरुणाची ओळख आधार कार्ड वरून पटली. मृत ऋषिकेश वर धारदार शस्त्राने वार करून डोक्यात दगड घातल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. मात्र खुनाचे नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही.

यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी केली होती. सीपीआर मध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पोलिसांनी आपली यंत्रणा गतिमान केली असून लवकरच आरोपी पर्यंत पोहोचण्यात यश येईल असं सांगितलं जातंय. या घटनेमुळे परिसरात मात्र खळबळ उडाली आहे.

🤙 9921334545