
कोल्हापूर : कोल्हापूर सेंट्रल को-ऑप. कंझ्युमर्स स्टोअर्स लि., कोल्हापूर चा ६० वर्धानपन दिन उत्साहात साजरा झाला. संस्थेचा ६० वा वर्धापन दिन वेळी बोलताना प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन अभिषेक सुभाष बोंद्रे यांनी केले. कै. श्रीपतरावजी बोद्रें दादा यांनी कोल्हापूर सेंट्रल को-ऑप.कंझ्युमर्स स्टोअर्स लि. या नांवाने रोपट लावलं आणि बघताबघता या रोपटयांचा वटवृक्ष झाला. आज संस्था ६० वा वर्धापनदिन साजरा करत आहे. संस्थेची ही वाटचाल निश्चीतच मनाला सुखावणारी आहेच, पण त्याचंबरोबर नवी उमेद व ऊर्जा निर्माण् करणारी आहे. यावेळी संस्थेच्या वाटचालीची दिशा सांगून आम्हा युवकांना जेष्ठानी सहकार वाढविण्यासाठी आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करत दादांचा सहकाराचा वारसा जपण्यास कटिबद्ध असलेचे भावना व्यक्त केली.

यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना गोकुळचे मा . चेअरमन, सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व अरुण नरके म्हणाले स्व. श्रीपतराव दादा बोंद्रे यांनी या संस्थेतूनच माझ्यासह अनेकांना जिल्ह्याच्या सहकारामध्ये कामकारण्याची संधी दिली त्यावेळी जिल्ह्याच्या राजकारणाची सर्व सूत्रे यासंस्थेत ठरवली जात होती. विद्यमान चेअरमन अभिषेक बोंद्रे यांचा राजकीय वाटचालीची सुरुवात झाली असून लवकरच जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना संधी मिळेल. बोंद्रे दादांच्या कार्यकर्त्यांनी एकसंध होऊन त्यांच्या पाठीशी राहावे. यावेळी दादांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सहकारातील दशा व दिशा या विषयावर बोलताना प्रा. मधुकर पाटील म्हणाले सहकारामुळेच ग्रामीण व शहरी लोकांचे जीवनमान उंचावले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार रुजवण्याच काम स्व. श्रीपतराव बोंद्रे दादांनी केले.
माणसांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यू पर्यंत सहकार्याची गरज असते, सहकार आणि सहकार्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे सहकारामुळेच गोरगरिबांची मुलं इंजिनिअर, डॉक्टर झाले आहेत. सहकार नसता तर महाराष्ट्र वाढलाच नसता, सहकार्यामुळेच जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने, सूतगिरण्या, दूधसंस्था, विकास संस्था, पाणीपुरवठा संस्था, ग्राहक संस्था उभा राहिल्या. अभिषेक बोंद्रे यांच्यासारखा उच्चशिक्षित तरुण सहकारात येत आहे, त्याच आपण सर्वांनी स्वागत करू व अभिषेक बोंद्रे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कॉ. चंद्रकांत यादव, भुयेवाडीच्या मा. सरपंच रानी पाटील, डॉ. उद्धव पाटील, उदय पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचा आभार संस्थेचे धान्य विभाग प्रमुख भिकाजी पाटील यांनी केले व सूत्र संचालन प्रा. दिनेश डांगे यांनी केले यावेळी ६०व्या वर्धापन दिनानिमित्ताने संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाला सांस्थेच्या व्हा. चेअरमन श्रीमती रमा बोंद्रे, अनिल निकम, अरुण सावंत, अरुण निंबाळकर, सुहास बोंद्रे , पृथ्वीराज निकम , बाळासो दळवी , संजय कवठेकर ,सुधीर पाटील , संभाजी नाळे, दिलीप संकपाळ, कृष्णात चौगले, राहुल दळवी, अजित पाटील, निवृत्ती पाटील, रंगराव पाटील, दीपक व्हरगे, उमेश पाटील, सुमित चौगुले, दत्तात्रय बोरगे, योगेश माने व बोंद्रे परिवारावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.