चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर गाणं नव्याने समाविष्य करणारा ‘वेड’ पहिलाच

मुंबई: रितेश देशमुख दिग्दर्शित वेड या चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या चित्रपटाच्या कमाईचा आकडा लवकरच 50 कोटी रुपयांच्या टप्प्याकडे पोहोचणार आहे. अशातच वेड चित्रपटाच्या टीमने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्यात कधीच कुणी एखादं गाणं नव्याने समाविष्य केलं नव्हतं. मराठीच नव्हे तर बॉलिवूड किंवा टॉलिवूडमध्येही असं घडलं नवह्तं. पण ‘वेड’ चित्रपटात आता सत्या (रितेश देशमुख) आणि श्रावणी (जिनिलिया देशमुख) यांच्यावर चित्रित केलेलं ‘वेड तुझं’ या गाण्याचं नवीन व्हर्जन समाविष्ट करण्यात येणार आहे. यासोबतच तीन नवे सीन्सही चित्रित करून त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

‘वेड’चं हे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना थिएटरमध्ये येत्या 20 जानेवारीपासून पहायला मिळणार आहे. वेड चित्रपटाच्या माध्यमातून रितेश आणि जिनिलिया हे दोघं अनेक वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले. या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहून प्रेक्षक पुन्हा एकदा त्यांच्या केमिस्ट्रीच्या प्रेमात पडले. चित्रपटात आधी ‘वेड तुझं’ हे गाणं रितेश आणि जिया शंकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. त्या गाण्यानेही प्रेक्षकांवर जादू केली.

🤙 9921334545