
मुंबई : सध्या पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.या निवडणुकीत महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय? हे आज स्पष्ट होणार आहे.

आज दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाबाबत महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देणार याची घोषणा करण्यात येणार आहे. नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या बाबतीत अद्याप महाविकास आघाडीने भूमिका जाहीर केली नव्हती. या दोन्ही ठिकाणी कोणाला पाठिंबा द्यायचा याची आज घोषणा केली जाणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर होताच नाशिक मतदारसंघातील काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील सुधीर तांबे यांच्यामुळे जोरदार चर्चा झाली.