
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत असून मुंबईत विविध विकास कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

त्यांच्या दौऱ्यच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिक- ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. शिवाय वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे आज घाटकोपर-वर्सोवा मेट्रो काही कावालधीसाठी बंध असणार आहे. बीकेसी आणि गुंडवली मेट्रो स्थानक येथील उद्याच्या नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळे सव्वा चार ते साडे पाच या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण वाहिनी (कुलाबाकडे) तसेच 5.30 ते- 5.45 या वेळेत उत्तरवाहिनी (दहिसरकडे) वाहतूक संथ गतीने सुरू असेल. मुंबईतील वाहतूकीतीबाबत वाहतूक विभागाच्या अधिकृत माध्यमांवरून वेळोवेळी माहिती मिळणार आहे. आपल्याला कोणतीही समस्या अथवा शंका असल्यास आमच्याशी हेल्पलाईन क्रमांक अथवा ट्विटरवर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.