महाराष्ट्रात दररोज एक कोटी अंड्यांचा तुटवडा…

मुंबई: महाराष्ट्रात दररोज २.२५ कोटींहून अंड्यांची विक्री केली जात असून एक कोटी अंड्यांचा तुटवडा जाणवत असल्याचे महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

वाढत्या थंडीमुळे अंड्यांची मागणी वाढली असून दरही गगनाला भिडले आहेत. राज्यात अंड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाकडून नवी योजना तयार करण्यात आली आहे.पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी पीटीआयशी बोलताना असं म्हटलंय की, “राजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग नियोजन करत आहे. अंड्यांचा तुटवडा भरून काढण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू येथून अंड्यांची खरेदी केली जात आहे.

राज्यातील अंड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रत्येक जिल्ह्यात 1,000 पिंजऱ्यांसह 21,000 रुपयांच्या सवलतीच्या दरात 50 पांढऱ्या लेगहॉर्न कोंबड्या उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे.”

🤙 8080365706