डी.वाय. पाटील यांच्या पुत्रांनी आईच्या वाढदिवसाला वाटली 3 कोटींची शिष्यवृत्ती!

कोल्हापूर : आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आईच्या संस्काराची शिदोरी उपयुक्त ठरल्याची आणि आपल्या कर्तृत्वात तिचाच सिंहाचा वाटा असल्याची जाण ठेवत तिच्या कष्टाची उतराई म्हणून तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तब्बल तीन कोटींची शिष्यवृत्ती हुशार मुलांना वाटण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

मुलांचा हा उपक्रम केवळ कौतुकास्पद नव्हे तर आदर्शवतही ठरणार आहे. डॉ. डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, पुणे येथील डॉ. डी .वाय पाटील विद्यापीठाच्या प्रकुलपती डॉ. भाग्यश्री पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी हा उपक्रम राबविला.

माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांच्या पत्नी शांतादेवी पाटील मंगळवारी वाढदिवस होता. या निमित्ताने डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थेमध्ये प्रथम वर्षासाठी सर्वोच्च गुणांनी प्रवेश घेतलेल्या ६६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.

🤙 8080365706