
मुंबई : राज्य महिला आयोग मॉडेल उर्फी जावेदच्या पाठीशी उभा राहिला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून हल्ला होण्याची भीती उर्फी जावेदने व्यक्त केली आहे.यानंतर उर्फीला सुरक्षा पुरवण्याबाबत आयोगाकडून मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हा पत्रव्यवहार केला आहे. उर्फीला सुरक्षा पुरवण्याबाबत तात्काळ कारवाई करा असं पत्रच आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हे पत्र लिहिले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब असल्याचेही रुपाली चाकणकर यांनी या पत्रात नमुद केले आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलीस आयुक्तांनी उर्फी जावेदच्या चौकशीचे आदेश दिले होते. अधेरी येथील अंबोली पोलीसांनी तिची चौकशी केली. उर्फी नंतर आता चित्रा वाघ यांना चौकशीचा सामोरं जाव लागण्याची शक्यता आहे
