
दिल्ली: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत भाजप नेत्यांना मार्गदर्शन केले. भाजपची कमी ताकद असलेल्या ७२ हजार बुथवर फोकस करा, अशी महत्वाची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना दिली.

नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक दिल्ली होत आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. पहिल्या दिवशीच्या बैठकी अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य रोड शो झाला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल चौक ते बैठकीच्या ठिकाणादरम्यान भव्य रोड शो केला.पहिल्या दिवशीच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी भाजपची कमी ताकद असलेल्या 72 हजार बुथवर फोकस करा, अशा सूचना दिल्या. तर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येणाऱ्या सर्व ९ राज्यातील विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक भाजप जिंकणार, असा दावा भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला.
