
कोल्हापूर : महाराष्ट्र शासन व क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे ,महाराष्ट्र आँलिंपीक असोसिएशन यांच्या वतिने महाराष्ट्र आँलिंपीक वुशू क्रीडा स्पर्धा २०२२-२३ या स्पर्धा दि.९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान बालेवाडी, पुणे येथे झालेल्या स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळणी नेत्रदीपक कामगिरी केली.

नोडल ऑफिसर प्रवीण बोरसे, महाराष्ट्र ऑलिम्पिकचे महासचिव नामदेव शिरगांवकर साहेब, क्रीडा संचालक कांबळे उपसंचालक सुहास पाटील, एम ओ ए चे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र घुले, शिवाजी कोळी यांच्या उपस्थितीत स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट च्या खेळाडूंनी ५ सुवर्ण, ६ रौप्य, ९ कास्यपदकांची लयलुट केली आहे. कोल्हापूरच्या यशस्वी झालेल्या खेळाडूंची कौतुक डॉक्टर चंद्रशेखर साखरे यांनी केले.
या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे तावलू
(वैयक्तिक प्रकार ) सांन्सू ( वजन गट – फाईट )
१) कु.भुषण बाळासो जाधव (चनकॉन – कास्य / गुंणशू – सुवर्ण पदक)
२) कु.केदार भिकाजी कुंभार (तायजीक्वॉन :- कास्य)
३) कु.गणेश यशवंत पडवळ (ननक्वॉन- रौप्य/ ननगून- रौप्य)
४) कु.सार्थक सुधाकर पुरेकर (झिंगीक्वॉन :- कास्य)
५) कु.दिशा दत्तात्रय पाटील (चनकॉन -रौप्य / दावशू रौप्य)
६) कु.गायत्री श्रीकांत लिमकर (बगवाझांग :- रौप्य)
७) कु.काजल विलास शिंदे ( बगवाझांग :- कास्य)
८) कु. विकास हैबती गवड (दावशू :- सुवर्ण )
९ )कु.दिपक संतोषकुमार सुतार ( जैनशू सुवर्ण/क्वाशू रौप्य )
१०) कु.तौफीक महमद पेंढारी ( नंदाव :- कास्य)
११) कु. रसिका अनिल कांबळे (जैनशू :- कास्य /कौनशु :- सुवर्ण)
१२)कु.दिपक संतोषकुमार सुतार ( जैनशू – सुवर्ण/क्वाशू – रौप्य )
१३) कु. मुजमिन मेहबुब मुजावर (५२कि.खा.) कास्य
१४) कु.सौरभ राजाराम संकपाळ (५६ कि.खा.) कास्य
१५) कु.संकेत शहाजी पाटील (६०कि.खा.) सुवर्ण पदक
१६) कु.अनिल लक्ष्मण शेंडगे (६५कि.खा.) कास्य
कोच व मार्गदर्शक अविनाश बाबासाहेब पाटील, पंच सतिश वडणगेकर, सौरभ पाटील यांना ऑल महाराष्ट्र वुशु असो.चे अध्यक्ष – एस. एस. झेंडे, एस. एस. कटके (सेक्रेटरी) आणि वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट चे अध्यक्ष – राजगोंडा वळिवडे, सुभाष पासान्ना (सेक्रेटरी) यांचे मार्गदर्शन ,प्रोत्साहन लाभले.
