
कोल्हापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकी साठी आज रविवारी (दि. 15) ला मतदान प्रक्रिया सुरू आहे. 21 संचालकांच्या जागांसाठी एकूण 42 उमेदवार रिंगणात आहेत.कोल्हापूर येथील दसरा चौकातील श्री शहाजी महाविद्यालय याठिकाणी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. यावेळी 2556 मतदारांपैकी 2000 हुन अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आत्ता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी दुपारी अडीच वाजेपर्यंत एकूण 70 टक्के मतदान झाले आहे.

ही प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.श्री महालक्ष्मी सहकार सत्तारुढ पॅनेल आणि राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडी यांच्यात थेट लढत आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे सहाय्यक निबंधक बाळासाहेब पाटील काम पाहत आहेत.या निवडणुकीत शिक्षक ,आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामसेवक यांची मते महत्वपूर्ण आहेत.
