नबाब मलिक यांचेबद्धल इतका पुळका का ? जाती- धर्माचा आधार का घेता …. राजे गटाच्या कार्यकर्त्याचा मुश्रीफांना प्रश्न

कागल : मुश्रीफ साहेब,तुम्ही निर्दोष असाल तर इ डी च्या चौकशीला धाडसाने सामोरे जा? दूध का दूध ,पाणी का पाणी होऊन जाऊ द्या.उलटा चोर कोतवाल को डाटे या वृत्तीने नवाब मलिक, असलम शेख यांचे नाव घेउन जाती-धर्माचा आधार का घेता? नवाब मलिक यांचे बदल इतका पुळका का? या प्रश्नांची थेट उत्तरे तुम्ही द्या? असे स्पष्ट मत आमचे नेते राजे समरजीतसिंह घाटगे यांनी आपणास केले आहे. परंतु घाई -घाईने कार्यकर्त्यांना पुढे करून तीच तीच स्क्रिप्ट देऊन ,राजकीय स्वार्थ ठेवून मूळ प्रश्नाला बगल देता याचा अर्थ या प्रश्नाची उत्तरे द्यायचे धाडस तुमच्यात नाही का? अशी विचारणा आ.मुश्रीफ यांना राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

पत्रकात पुढे म्हंटले आहे,तुमच्या घरावर पडलेल्या ईडीच्या छापेमारीत माझा कोणताही संबंध नाही , वार करायचा असेल तर मी समोरून करतो, असे स्पष्ट उत्तर आमचे नेते राजे समर्जितसिंह यांनी आपणास दिले आहे.तुम्ही निर्दोष असाल तर घाबरता कशाला?धाडसाने चौकशीला सामोरे जा असा सल्ला पण दिला आहे, पण ते तुम्हाला रुचलेलं दिसत नाही. तो मी नव्हेच या नाटकाप्रमाणे कार्यकर्त्यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यावयास लावून त्यांच्या आडोशाचा आधार घेता हे तुम्हाला अशोभनिय आहे.धर्माचा आधार घेताना मुश्रीफ साहेब तुम्ही म्हणता कागल तालुक्यामध्ये 600 मंदिरे बांधली. या मंदिरांची नेमकी संख्या किती? खरे सांगाएक वेळ 700 चा एक वेळ 500 चा व कधीकधी 600 मंदिरे बांधली असे सांगता. ही मंदिरे तुम्ही बांधली की शासनाच्या पैशातून या मंदिरांना मदत केली हे एकदा खरे जनतेला कळू द्या.आमच्या माहितीप्रमाणे मतदारसंघातील एकूण गावाची संख्या 140 पकडली प्रत्येक गावात तीन मंदिरे गृहीत धरल्यास संख्या साडेचारशे होते. गावोगावी ही मंदिरे ग्रामस्थ, माहेरवासीन, देणगीदार यांच्या मदतीतून उभारली आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून या मंदिराना शासनाची मदत दिली असे समजुया,त्यात पुशारकी कसली?सहाशेहे चा आकडा आला कोठून?जरा निश्चित आकडा सांगा?गेली 25 वर्षे खोट्या आकडेवारीचा कागलच्या जनतेला वीट आला आहे. जनता आता सुज्ञ झाली आहे हे विसरू नका.

🤙 8080365706