रक्तदाब नियंत्रित ठेवणारे ‘हे’ पाच पदार्थ तुम्हाला माहित आहेत का?

आरोग्य टिप्स : रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते पाच खाद्यपदार्थ नियमितपणे खावेत जाणून घेऊयात?

केळी- काही अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की शरीरातील सोडियमचे प्रमाण तसेच रक्तवाहिन्यांवरील ताण नियंत्रित ठेवण्यासाठी केळीतील पोटॅशियम उपयुक्त ठरते.

राजगिरा. राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याच्या पिठाचे थालिपीट असे पर्याय तुम्ही यासाठी निवडू शकता.

मटकी देखील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मटकीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. रक्तदाब वाढविण्यासाठी जे एन्झाईम्स काम करतात, त्यांची वाढ नियंत्रित ठेवण्याचं काम पोटॅशियम करतं.

नारळाचं पाणीही रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी नारळपाणी पिण्यास हरकत नाही.खजूरमध्येही भरपूर प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम असतं. हे दोन्ही घटक शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.