शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी विजेता

कोल्हापूर: क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा, हजारो कुस्ती शौकिनांच्या लागलेल्या त्या नजरा अशा रोमहर्षक वातावरणात पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा शिवराज राक्षे यांनी पटकावली.

शिवराज राक्षे व महिंद्र गायकवाड यांच्यामध्ये अंतिम फेरीची लढत झाली. या लढतीत शिवराज राक्षे यांनी महेंद्र गायकवाडला  अवघ्या मिनिटाभरात चितपट करत महाराष्ट्र केसरी ठरला. राक्षे हा नांदेडचा आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री गिरीश महाजन, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्तीचे अंतिम फेरी पार पडली. याप्रसंगी सांगली येथील कुस्ती प्रशिक्षक उत्तमराव पाटील यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.  यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा कोण जिंकणार ? याची उत्कंठा कुस्ती शौकिनांमध्ये होती. अंतिम फेरी शिवराज राक्षे व महिंद्र गायकवाड या दोन तुल्यबळ पैलवानमध्ये झाली. विजेत्या व उपविजेत्या पैलवानांना बक्षीस देण्यात आली.