गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये भीषण आग

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला लागून असलेल्या गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये भीषण आग लागलीआहे.

आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार दुपारी तीनच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली आहे.या आगीचे धुराचे लोट राष्ट्रीय महामार्गावरून दिसत आहेत.यावरून आगीची भीषणता लक्षात येते.आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार कर्मचारी पहिल्यांदाच बाहेर पडल्याचे समजते. मात्र, याबाबत अजून कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.जीवितहानी टाळण्यासाठी ॲम्बुलन्स आग लागलेल्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत.

गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत. केमिकल कंपनीत आग लागल्याने इतर कंपन्यांकडे आग पसरू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.