‘कोणीही क्रेडिट घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये’; संजय गायकवाड

मुंबई: गिरीश महाजन यांच्या याच विधानावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनीदेखील प्रतिक्रिया दिली असून कोणीही क्रेडिट घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. असे ते म्हणाले आहेत.

आम्हाला कोणाचीही फूस नव्हती. आम्हाला कोणीही भूलवलेलं नाही. आम्ही आमच्या मनाने बंड केले, असे संजय गायकवाड म्हणाले आहेत. कोणी मुर्खासारखे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला काहीही अर्थ नाही. शिवसेनेचे सर्व आमदार बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे होते. आम्हाला वर्षा बंगला तसेच मातोश्रीवर प्रवेश नव्हता. कामासाठी बैठका होत नव्हत्या. सतत सगळे आमदार त्रास्त झाले होते. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची कामं जोमात चालू होती. आमचा स्थानिक पातळीवरील लढा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत होता,” असे संजय गायकवाड म्हणाले.

🤙 8080365706