शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ मिळवून देण्याची सुविधा राजे बँकेस द्या; राजे समरजीतसिंह घाटगे….

दिल्ली येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे शेजारी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे

कागल : केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकारी बँकेच्या ग्राहकांना सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याची घोषणा जुलैमध्ये केली होती. त्यानुसार कागल येथील राजे बॅंकेच्या ग्राहकांना अनुदानाच्या सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याची सुविधा सुरु करण्यास मंजुरी द्यावी. अशी मागणी राजधानी दिल्ली येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचेकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली.

त्याबाबत उभयंतामध्ये सविस्तर चर्चा होऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ. अशी ग्वाही मंत्री कराड यांनी दिली.अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.यावेळी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे उपस्थित होत्या. राज्यमंत्री भागवत कराड यांना राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँकेच्या नवीन शाखेच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रणही दिले, तसेच राजे बॅंकेच्या नवीन पाच शाखांना मंजूरी दिल्याबद्दल श्री.घाटगे यांनी त्यांचे आभारही मानले शासकीय अनुदानाच्या विविध योजनांचा बहूजन समाजातील लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी राजे बॅंकेच्या माध्यमातून सहकार्य करु.त्यामुळे बहूजन समाजातील युवकांना स्वतःच्या पायावार ऊभे करण्यास फायदा होईल.असा विश्वास घाटगे यांनी व्यक्त केला.पश्चिम महाराष्ट्रातील नागरी बँकांमध्ये अग्रेसर असलेल्या राजे बँकेस काही दिवसांपुर्वीच डाॕ कराड यांच्या सहकार्याने आरबीआयकडून कागल तालुक्यातील मुरगूड, केनवडे, चिखली तर करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगांव व आजरा तालुक्यातील उत्तुर येथे नविन पाच शाखा सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. तसेच मोबाईल बँकिंगसाठीसुद्धा मंजुरी मिळाली आहे. राजे बँक ही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कर्ज वितरणामध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. बँकेने ग्राहकांचा विविध ठेव व कर्ज योजनांच्या माध्यमातुन विश्वास संपादन केला आहे. राजे बँकेस ही सुविधा उपलब्ध झाल्यास ग्राहकांना शासकीय योजनांचा थेट फायदा होणार आहे.