राजे बँकेमार्फत भाजीपाला विक्रेत्यांना अर्थसहाय्य…..

कागल येथे समरजितसिंहराजे घाटगे यांचे हस्ते भाजी विक्रेत्या महिलाना कर्ज मंजुरी पत्रे दिली.

कागल : येथील राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बँकेमार्फत श्री छत्रपती राजर्षि शाहू महाराज व्यवसाय वृध्दी कर्ज योजने अंतर्गत भाजीपाला विक्री व्यवसायाकरीता आठ महिला व्यावसायिकांना कर्ज वाटप केले.

शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंहराजे घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेमार्फत श्री छत्रपती राजर्षि शाहू महाराज व्यवसाय वृध्दी कर्ज योजना सुरु केली आहे. सवलतीच्या व्याजदरात विनातारण हे कर्ज देण्यात येते.त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांनी याचा फायदा घेतलाआहे.या लाभार्थ्यांनी श्री.घाटगे यांचे आभार मानले.यामध्ये इंदुबाई श्रीकांत कदम,भागिरथी रामचंद्र नेलें,पार्वती शंकर करीकट्टे,लक्ष्मी रामचंद्र आपटे,पाकीजा नूरमहमद मुल्ला,संगिता मनोहर टोणपे,गौराबाई शंकर वडड्, रा.कागल व लैला रमजान खंडारे रा.कसबा सांगाव यांचा समावेश आहे.