आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ…

मुंबई: सध्या लग्नाचे सीझन सुरू आहे, त्यामुळे सोनं, चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव ५५,७०० रुपयांवर आहे, चांदीच्या किंमती ६८,६०० रुपयांवर आहेमल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ०.१३ टक्क्यांच्या वाढीसह ५५,७८४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. आज सोन्याचा भाव५५,८ ०० रुपयांवर आहे. मागच्या सत्रातील ट्रेडिंगमध्ये हा दर १७४ रुपयांनी घसरला आणि ५५,६९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला.याशिवाय एमसीएक्सवर चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. आज चांदी ०.४२ टक्क्यांसह ६८,३५५ रुपये प्रति किलो ग्रॅमवर बंद झाला.