जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडर वरील बंदी उठवली…

मुंबई : जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या कंपनीच्या बेबी पावडरच्या विक्रीवरची बंदी उठवण्यात आली आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचा बेबी पावडर बनवण्याचा परवाना रद्द करण्यासाठीची महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.त्यामुळे आता या कंपनीला पावडरचं उत्पादन करता येणार असून विक्रीवरची बंदीही हटवण्यात आली आहे.न्यायमूर्ती गौतम पटेल आणि एसजी ढगे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विनाकारण या प्रकरणात दिरंगाई करत आहे, अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे. तर मुंगी मारण्यासाठी आपण हातोडा वापरू शकत नाही, असं विधानही न्यायालयाने केलं आहे. एक सँपल स्टँडर्ड क्वालिटीचं नाही, म्हणून परवानाच रद्द करणं हे कठोर पाऊल असेल, असंही कोर्टाने नमूद केलं आहे.