प्रवाशांची गैरसोय; महाराष्ट्र एक्सप्रेस तीन दिवस रद्द

कोल्हापूर : गोंदिया व कोल्हापूर येथून सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस तीन दिवस रद्द करण्यात आली आहे.यामुळे शेकडो प्रवाश्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

गोंदिया कोपरगाव ते कान्हेगाव दरम्यान 23 जानेवारीपर्यंतच्या ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहे. याचा फटका महाराष्ट्र एक्सप्रेस बसला असून 21, 22 व 23 जानेवारी रोजीची अप आणि डाऊन महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आली असल्याचे रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धपत्रात म्हटले आहे.ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांच्या संचालनावर परिणाम होणार आहे. कोल्हापुर व गोंदिया येथून सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस 21, 22 व 23 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तसेच दादर- साईनगर शिर्डी एक्सप्रेस 7, 14 आणि 21 जानेवारी रोजी साईनगर शिर्डीहून सुटणारी रेल्वे रद्द करण्यात आली.