कागल शहरात खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा; आ. हसन मुश्रीफ यांची घोषणा……..

कागल: “खड्डेमुक्त कागल” या अभियानाचा प्रारंभ आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रताप उर्फ भैया माने, प्रकाशराव गाडेकर आदी प्रमुख.

कागल: कागल शहरात खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी घोषणा आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. आमदार निधीच्या ३६ लाखातून महिनाभरातच कागल खड्डेमुक्त होईल, असेही ते म्हणाले.

“खड्डेमुक्त कागल” या मोहिमेचा प्रारंभ आमदार मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

भाषणात आमदार मुश्रीफ म्हणाले, काही रस्ते तीन वर्षांपूर्वी झालेले आहेत. तसेच; काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नळ घेताना खड्डे पडलेले आहेत. संपूर्ण देशात सर्वांगसुंदर कागल करणे आणि स्वच्छतेच्या बाबतीत शहराला अग्रेसर ठेवणे, याला प्राधान्य दिले आहे.

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या आधी राज्यात भाजप सरकार असताना आणि गेल्या सहा महिन्यात कागलला एक रुपयांचाही निधी मिळालेला मिळालेला नाही. विरोधकांचे कागलवरील हे बेगडी प्रेम आहे.

फेटे घातले म्हणजे ते सरपंच नव्हेत………”

माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, कालच समरजीत घाटगे यांनी भाजपचे नूतन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार ठेवला होता. सत्कार समारंभात भाजपचे किती सरपंच आणि किती सदस्य निवडून आले आहेत, याचा आकडा सांगण्याचे धाडस त्यांना झाले नाही. २० टक्केसुद्धा सदस्य निवडून आलेले नसताना जनतेच्या डोळ्यात नुसती धुळफेक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. साखर कारखान्याच्या कामगारांनाही त्यांनी फेटे बांधले होते. फेटे बांधले म्हणजे ते सरपंच नव्हेत, अशी टीकाही त्यांनी केली. व्यासपीठावर माजी आमदार के. पी . पाटील, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले, मुख्याधिकारी श्रीराम पोवार, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गवळी, नामदेव पाटील, नवल बोते, एम . आर .चौगुले, संजय ठाणेकर, ॲड. संग्राम गुरव, संजय चितारी, अस्लम मुजावर, विवेक लोटे, अमित पिष्टे, आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे, सुनील माळी, नवाज मुश्रीफ, बच्चन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत प्रवीण काळबर यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले.