कुंभी-कासारी निवडणुकीत विनय कोरे यांच्या पाठींब्यासाठी प्रयत्न

कुडीत्रे : कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या निवडणकित सत्ताधारी व विरोधक यांच्या हालचालींना छुप्या हालचालीं सुरू आहेत. दोन्ही नेत्यांकडे उमेदवारांची भाऊगर्दी सुरू आहे. विनय कोरे यांनी पाठींबा द्यावा यासाठी सत्ताधारी व विरोधक यांच्यात प्रयत्न सुरू आहेत.

विनय कोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नरके गट व विरोधी शाहू आघाडीचे नेतेही विनय कोरे यांचा पाठींबा मिळवण्यासाठी भेट घेणार आहेत.

विनय कोरे यांचा पाठिंबा कुणाला हा प्रश्न आहे.

सत्ताधारी नरके गटाचे नेतृत्व चंद्रदीप नरके करत आहेत. विरोधी शाहू आघाडीचे बाळासाहेब खाडे, बाजीराव खाडे, एकनाथ पाटील, संभाजी ज्ञानू पाटील, राजेंद्र सुर्यवंशी, प्रकाश देसाई, दादूमामा कामीरे करत आहेत. उमेदवारीसाठी दोन्ही पॅनेलच्या नेत्यांकडे उंबरे झिजवले जात आहेत. विरोधक एकवटले आहेत. पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या कुंभी कासारी साखर कारखाना निवडणूक २३ जागांसाठी होणार लढत होणार आहे.

शासनाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबर पर्यंत थांबवल्या होत्या. २१ डिसेंबर पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वैभव नावडकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रदीप मालेगाव यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता कुंभी कासारी पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी नरके गट व विरोधक राजर्षी शाहू आघाडी यांच्यात सत्ता खेचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.