अद्यापही कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत..!

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात काही भागांत ४ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अनेक भागांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

शहरात उंचावर असलेल्या भागांत पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याचे महानगरपालिकेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.पाणीपुरवठा बंद असल्याने शहरात विविध ठिकाणी आज टँकरने महापालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला.कोल्हापूर शहराला बालिंगे आणि शिंगणापूर येथील उपसा केंद्रातून पाणी पुरवठा करण्यात येतो.मात्र शहरातील अंतर्गत पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला दोन ठिकाणी मोठी गळती लागली आहे.पाईप लाईन दुरुस्तीमुळे दोन्ही पाणीउपसा केंद्रावर अवलंबून असणार्‍या भागात 4 दिवस पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच काही ठिकाणीअपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.शहरातील हरी ओमनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला गळती लागली आहे.ही गळती काढण्याचे काम महापालिकेकडून करण्यात येत आहे . शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे आज शाहू मिल परिसरातील मातंग वसाहतीमधील काही वॉर्डात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.यामुळे नागरिकांची झालेली पाण्याविना दैना पाहायला मिळाली.

🤙 8080365706