अडीच वर्षांच्या मुलीसह पत्नीच्या हत्येने औरंगाबाद हादरलं

औरंगाबाद: दुहेरी हत्याकांडाने औरंगाबाद हादरलं असून चारित्र्याच्या संशयावरून एकाने आपल्या पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. समीर विष्णु म्हस्के ( रा. भाग्यनगर, बाबा पेट्रोलपंपाचे जवळ, औरंगाबाद ) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून, पत्नीचे आरती समीर मस्के तर मुलीचं निशात समीर मस्के नावं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात समीर मस्के हा आपल्या पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीसह राहत होता. मात्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घेत होता. यावरून अनेकदा त्यांच्यात वाद देखील होत होता. दरम्यान काल रात्री पुन्हा यावरून वाद झाला. त्यानंतर समीर मस्के यांनी घरातील नायलॉनच्या दोरी आणि मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नी आरती आणि मुलगी निशात यांची गळा आवळून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

🤙 8080365706