दुधगंगा प्रकल्पांतर्गत कूर उपकालवा व नागणवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांना पाणी परवान्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या वाटप

आमदार प्रकाश आबिटकर यांचा लावणे

गारगोटी : भुदरगड तालुक्यतील दुधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पांतर्गत कूर उपकालवा व नागणवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाणी परवाने मिळत नव्हते. याकरीता आमदार प्रकाश आबिटकर व कोल्हापूर पाटबंधारे विभाग यांच्या प्रयत्नातून पाणी परवाने वाटपासाठी आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमधून 45 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आरज सोमवार सकाळी 11 वाजता गारगोटी पाटबंधारे कार्यालयात पाणी उपसा परवान्यांचे वाटप आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.

कूर उपकालवा व नागणवाडी प्रकल्पाच्या उभारणीकरीता ज्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी देवून प्रकल्प पुर्णत्वास गेला. परंतू प्रकल्पाच्या पायामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पामधून पाणी उपसा करण्याकरीता पाणी परवाने मिळत नव्हते. याकरीता त्यांची सातत्याने मागणी होती. याबाबत आमदार प्रकाश आबिटकर पाटबंधारे विभागासमवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये पाणी परवाने देणेकरीता कॅम्पचे आयोजन करण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्प मधून 45 शेतकऱ्यांना पाणी परवाने मंजूर करण्यात आले असून उद्या सोमवार दि.09/01/2023 रोजी सकाळी 11 वाजता गारगोटी पाटबंधारे कार्यालयात पाणी उपसा परवान्यांचे वाटप करण्यात येणार आहेत.

🤙 8080365706