
पुणे: भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी आधी स्वत: पालकमंत्री असताना पुण्यात काय कामं झालीत ती बघावीत आणि नंतर मला बोलावं. दुसऱ्याला टपली मारल्याशिवाय अजित पवारांचा विषय संपत नाही. त्यांना पेलावत नाही त्यामुळे पवार कुटुंबीय सारखा मला चिमटा काढत असते, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील? चंद्रकातं पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.अजित पवार यांनी आधी स्वत: पालकमंत्री असताना पुण्यात काय कामं झालीत ती बघावीत आणि नंतर मला बोलावं. दुसऱ्याला टपली मारल्याशिवाय अजित पवारांचा विषय संपत नाही. त्यांना पेलावत नाही त्यामुळे पवार कुटुंबीय सारखा मला चिमटा काढत असते, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
