
कोल्हापूर : न्यू पॉलिटेक्निक आणि अर्थमुवर्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन कोल्हापूर यांच्यात नुकतीच सामंजस्य करार करण्याच्या दृष्टीने सकारात्मक बैठक झाली.

सन्माननीय प्राचार्य डॉ. संजय दाभोळे सर आणि असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र पाटील साहेब यांनी सविस्तर चर्चा केली. या चर्चेमध्ये विभागप्रमुख आणि असोसिएशनचे सर्व संचालक सहभागी होते. या चर्चेदरम्यान असोसिएशनला तंत्रनिकेतनकडून पूर्ण तांत्रिक सहाय्य करण्याची ग्वाही प्राचार्य दाभोळे यांनी दिली. तसेच, असोसिएशनकडून लागणाऱ्या उपकरणांची पूर्तता असोसिएशन करेल, अशी हमी देण्यात आली.
दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने अर्थमुव्हींग इक्विपमेंट ड्रायव्हिंग आणि दुरूस्तीसाठी कोर्सेस सुरू करण्यात यावेत असा ठराव करण्यात आला. या सामंजस्य बैठकीसाठी प्रा. नितीन पाटील सर यांनी विशेष प्रयत्न केले. अभय देशपांडे यांनी अनुमोदन दिले. विभागप्रमुख संग्रामसिंह पाटील यांनी आभार मानले. सदर सामंजस्य करार हा ऑटोमोबाईल, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या विभागांच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.
