आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी प्रयत्न करणार ; राहूल पाटील

कोल्हापूर: समाजातील सर्व.घटकाचे आरोग्य चांगले रहावे म्हणून अंगणवाडी व आशा कर्मचारी अहोरात्र झटतात पण त्याना पुरेसा मोबदला मिळत नाही. त्याचे मानधनात वाढ होण्यासाठी. शासन पातळीवर प्रयत्न करणार असे प्रतिपादन. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल पाटील यांनी केले.

खुपीरे ता. करवीर येथे आ.पी.एन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून. उल्लेखनिय काम केलेल्या अंगणवाडी सेविका आशा मदतनीसाना राहूल पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देउन गौरविण्यात आले। ग्रामपंचायतीचे.डेप्युटी सरपंच युवराज पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.अध्यक्षस्थानी दत सेवा संस्थेचे उपाध्यक्ष आनंदा पाटील होते.या कार्यक्रमाला करवीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पाटील , सर्जेराव जोती पाटील दत्तात्रय तुकाराम पाटील, रणजित पाटील साबळेवाडी, बजरंग दुध संस्था अध्यक्ष गजानन पाटील, विलास पानारी,सरपंच दिपाली जाभळे, उपसरपंच सागर पाटील सदस्य भगवान हराळे.सदाशिव पाटील सर, आदी उपस्थित होते.

🤙 8080365706